मुंबईतील हिंदू तरुणी श्रद्धा वालकर’ हीचे 35 तुकडे करून तिची निर्घृणपणे हत्या करणारा नराधम लव जिहादी आफताब पुनावालाच्या विरोधात देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे हिंदू मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद ‘लव जिहादाला रोखण्या साठी स्वतंत्र आणि कठोर असा ‘लव जिहाद विरोधी कायदा करण्यात यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीची महिला शाखा रणरागिणीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदना द्वारे करण्यात आली आहे .
श्रद्धाचे हे प्रकरण ताजे असतांना उत्तर प्रदेशातील लखनौ येथेही 19 वर्षीय निधी या हिंदू तरुणीने धर्मांतर करण्यास नकार दिल्यामुळे सूफियान या मुसलमान युवकाने तिला चौथ्या मजल्यावरुन फेकून तिची निर्दयीपणे हत्या केल्याची दुसरी घटना समोर आली आहे. त्यामुळे हिंदू मुलींच्या रक्षणाकरीता लवकरात लवकर लव जिहादी कायदा अमलात आणावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे .
तसेच या निवेदनात या केवळ एक दोन घटना नसून अशी अनेक उदाहरणे या निवेदनात देण्यात आली आहे. यामध्ये असे म्हटले आहे की. जिच्यावर प्रेम करतो, त्या व्यक्तीची अशी निघृण हत्या कोणी करणार नाही. त्यामुळे या वासनांध आणि नराधम लव जिहादी आफताब पुनावाला आणि सूफीयान यांना तात्काळ फासीवर लटकवावे, अशी मागणी केली आहे. या आंदोलनात विविध हिंदु संघटनांनी सहभाग घेतला. आणि आता अबला नको तू सबला हो, चंडी, दुर्गा, काली हो. लव जिहादी नराधम आफताबला फाशी द्या, लव जिहाद विरोधी कायदा लागू करा अशा घोषणाही देण्यात आल्या.
तसेच आपल्या मुली बाळींना पळवण्यासाठी हे नराधम आपल्या घरापर्यंत पोहोचले आहेत. आपल्या पोटच्या पोरीचे 35 तुकडे पुन्हा होऊ देणार आहात का? त्यामुळे लव जिहाद’च्या घटना रोखण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात लव जिहाद विरोधी कायदा करण्यात यावा, यासाठी आम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची लवकरच भेट घेणार असल्याचेही या वेळी रणरागिणी शाखेच्या डॉक्टर ज्योति दाभोळकर यांनी बेळगाव एक्सप्रेस ला सांगितले.