Marathi News

बेळगावच्या उद्योजकांनी बेंगलूर येथे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची भेट

बेळगावच्या उद्योजकांनी बेंगलूर येथे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची भेट घेऊन बेळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या बाबतीत चर्चा केली. आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली उद्योजकांनी ही भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बेळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या साठी सर्व ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली. बैठकीला नगरविकास खात्याचे मंत्री बीए बसवराज देखील उपस्थित होते. बेळगावात टेक पार्क स्थापन करण्यात येईल फौंड्रि आणि हैडरो ड्रॉ लिंक उद्योगासाठी प्रत्येकी पाचशे एकर औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात येईल. ऑटोमोबाईल उद्योगही बेळगावात आणण्यात येतील. बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात बेळगावातील प्रमुख व्यक्तींशी चर्चा करण्यासाठी दोन तास वेळ देण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी उद्योजकांच्या शिष्ट मंडळाला दिले. ब्यूरो रिपोर्ट बेलगाव एक्स्प्रेस

Belgaum Express News Desk

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: